दिल्लीचे अन्न मंत्री असीम खान यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी

दिल्लीचे अन्न मंत्री असीम खान यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी

दिल्लीचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असीम अहमद खान यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकले आहे.

असीम खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. असीम खान यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाचे प्रकरण पुढील तपासासाठी सीबीआयकडे देणार असल्याचे केजरीवाल यांनी जाहीर केले.

इमरान हुसैन असीम खान यांची जागा घेणार आहेत. स्थानिक विकासकासोबत मिळून असीम खान यांनी सहा लाखाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. असीम खान यांच्याकडे पर्यावरण खाते सुध्दा होते.

ऑडीओ क्लिपमधील संभाषणाच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईबद्दल बोलताना केजरीवाल म्हणाले की, आम्हाला संपूर्ण देशात संदेश द्यायचा आहे. भ्रष्टाचार कुठल्याही पातळीवरचा असो आम्ही तो सहन करणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *