शुक्रवारी (7 ऑक्टोबर 2025) रात्री काढण्यात आलेल्या या वरातीची सध्या जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू आहे. यानिमित्ताने कोल्हापूरकर आपला आनंद कशाप्रकारे साजरा करतील हे सांगता येत नाही हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
कुठे काढण्यात आली ही आगळीवेगळी वरात?
कोल्हापूरातील गगनबावडा रोडवरील खांडसरी परिसरातून शिंगणापूर रोडवरील पाण्याची टाकीपर्यंत नवदांपत्य संकेत आणि पूजा माने यांच्या वरातीने शुक्रवारी रात्री सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनोखे वैशिष्ट्य म्हणजे या वरातीसाठी वधू-वर दोघांना चक्क ‘जेसीबीच्या बकेटमध्ये’ बसवण्यात आले होते. नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत डीजेच्या ठेक्यावर मोठ्या आनंदाने ही वरात घरापर्यंत गेली. ज्यामुळं खऱ्या अर्थानं ‘लग्नाची वरात थेट JCB तून आली दारात’ असं म्हणायला हरकत नाही.
महत्त्वाचं म्हणजे नव दांपत्य संकेत आणि पूजा हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. संकेत माने हे व्यवसायाने आर्किटेक्ट असून, पूजा माने यांनी बी. फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. संकेत यांचे वडील राजेश दत्तात्रय माने हे व्यावसायिक असून त्यांच्या मालकीच्या तब्बल चार जेसीबी आहेत. केवळ हौसेपोटी या जेसीबींपैकी एक जेसीबी मशीन खास वरातीसाठी वापरण्यात आली होती. कमाल आहे ना?
