राज्यात थंडीचा कडाका वाढला, धुक्याची चादर, देशभरातील अनेक भागात पावासाचा इशारा; हवामान विभागाची महत्त्वाची माहिती

मुंबईसह राज्यभरात थंडी वाढू लागली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत दिवसभर आकाश निरभ्र राहील. तसंच धुकंही असेल. मुंबईत पहाटेच्या वेळी धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, BKC पासून दक्षिण मुंबईपर्यंत, हवेची गुणवत्ता झपाट्याने घसरली आहे. मुंबईत दिवसाचं तापमान 34 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

मुंबईत हवेची गुणवत्ता बिघडली

काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात हवेची गुणवत्ता सुधारली होती. प्रदूषक घटक वाहून गेले होते. पावसामुळे आर्द्रता आणि प्रदूषक कण हवेतून नष्ट झाले होते. मात्र त्यानंतर काही दिवसांतच मुंबईत हवेची गुणवत्ता पातळी ढासळली आहे. त्यामुळे मुंबईकरांना प्रवास करताना संरक्षक मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *