मोनोरेलमध्ये पुन्हा तांत्रिक बिघाड; वडाळा डेपोजवळ रुळावरून घसरली, MMRDAने चुकीवर पांघरूण घालताना कोणतं कारण सांगितलं?

आज सकाळी वडाला डेपोजवळ मोनोरेल रुळावरून घसरल्याची घटना घडली. ही घटना सकाळी 9 .30 वाजताच्या सुमारास घडली असून, नव्याने आणलेली Medha Servo Drives या कंपनीची मोनोरेल रेक चाचणी फेरीसाठी वापरली जात होती. रुळांवरील ‘गाईडवे बीम’ बदलताना ती अचानक घसरल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात एका कोचचे अंडरकॅरेज नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

एक ‘मॉक ड्रिल’ होती

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यानंतर त्यांना परत पाठवण्यात आले. “ही घटना प्रत्यक्षात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या तयारीची एक ‘मॉक ड्रिल’ होती,” असा दावा MMRDA अधिकाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL)ने या घटनेवर अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मोनोरेलमध्ये नवीन सिग्नल प्रणाली, नवीन मोनो गाड्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करण्याचे काम सध्या सुरू आहे. मोनोरेलची कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी कम्युनिकेशन-बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) सिग्नलिंग प्रणालीची चाचणी सुरु आहे. या प्रकल्पाचे काम Medha SMH Rail Pvt. Ltd. ही कंपनी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *