तीन दिवसांपासून बेपत्ता, नंतर शेतातील विहिरीत बॉडी सापडली; 21 वर्षीय विवाहितेसोबत काय घडलं?

जालना जिल्ह्यातील खादगाव येथे एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

2 नोव्हेंबर 2025 रोजी खादगाव येथील विवाहित महिला सानिया शेख साजीद (वय 21 वर्ष हल्ली मुक्काम रा. चंदनझिरा जालना) ही बेपत्ता असल्याची तक्रार तिचा तिचा पती शेख साजीद याने चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये केली होती. यावरून पोलिसांनी या महिलेचा शोध सुरु केला होता. मात्र, बुधवारी (5 नोव्हेंबर) अचानक या महिलेचा मृतदेह आढळून आला. खादगाव येथे त्यांच्याच शेतात असलेल्या विहिरीत या महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांच्या टीमने तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि महिलेचा मृतदेह नागरिकांच्या मदतीने पंचायत समक्ष विहिरीतून वर काढला. त्यानंतर तिला जालना येथे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *