दोन कोवळी मुलं मारली, आजोबांचाही जीव घेतला; पुण्यातील तो नरभक्षक बिबट्या अखेर ठार,

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गाव आणि परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वन विभागाने ठार केलं आहे. तब्बल तीन जीव घेणाऱ्या या नर जातीच्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू होती.

मंगळवारी रात्री उशिरा वन विभागाच्या पथकाला ड्रोनच्या साहाय्याने बिबट्याचा मागोवा लागला. त्यावेळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी डार्ट मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो नेम चुकला. त्यानंतर संतप्त झालेल्या बिबट्याने अचानक वन अधिकाऱ्यांवर झडप घालण्याचा प्रयत्न केला. या प्रतिहल्ल्यातून स्वतःचा बचाव करत दोन शार्प शूटरांनी सलग तीन राउंड फायर केले आणि बिबट्या जागीच कोसळला. सुमारे सहा वर्षांचा हा नर जातीचा बिबट्या असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *