शेतात वृद्ध महिलेला गाठलं; आधी सामूहिक अत्याचार मग हातात दगड घेऊन… भिवंडीत नराधमांच्या कृत्याने खळबळ

भिवंडी तालुक्यातील चावेभरे या गावांमध्ये शेतावर गेलेल्या एका 65 वर्षीय वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार करून नंतर दगडाने ठेचून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चावे भरे गावात मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.

मृतक पीडित वयोवृद्ध महिला आपल्या शेतावर गेली होती. त्यावेळी तिच्यावर शारीरिक अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार कुटुंबियांना समजल्यानंतर कुटुंबीयांनी शेतावर धाव घेतली. त्यावेळेस वृद्ध महिलाही निपचित पडली होती. कुटुंबीयांनी ही बाब स्थानिक गणेशपुरी पोलिसांना कळविल्यानंतर गणेशपुरी पोलीस ठाण्यात पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय या ठिकाणी आणला. गणेशपुरी पोलिसांसह ठाणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिनव मित्तल,उपविभागीय अधिक्षक राहुल झालटे यांनी घटनास्थळासह रुग्णालयाला भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *