महाराष्ट्रात धावणाऱ्या दोन प्रमुख वंदे भारत एक्स्प्रेसबाबत मोठी अपडेट, आता ‘या’ स्थानकातही थांबा

महाराष्ट्रात धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसबाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्रातून सध्या 12 वंदे भारत धावतात. या गाड्या विविध शहरांना जोडतात. अनेक वंदे भारत एक्स्प्रेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. दोन प्रमुख वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना नवीन स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. तसंच, याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्र.20669/20670) या गाडीला आता किर्लोस्करवाडी स्थानकात थांबा मिळणार आहे. तर, सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्र. 22225/22226) या गाडीला आता दौंड स्थानकांत थांबा मंजूर झाला आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रायोगिक थांबा यशस्वी झाल्यानंतर या गाड्या लवकरच नवीन स्थानकांवर थांबण्यास सुरुवात करतील. त्यामुळं या दोन्ही मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, सध्या मुंबई ते सोलापूर वंदे भारत सीएसएमटी स्थानकातून संध्याकाळी 16.05 वाजता सुटते त्यानंतर संध्याकाळी 10.40 वाजता सोलापूरला पोहोचते. या गाडीला पुण्यात 5 मिनिटांचा थांबा असतो. संध्याकाळी 7.10 वाजता पुण्यात पोहोचते.

या गाडीला असलेले थांबे

दादर- संध्याकाळी 4.15 वाजता
ठाणे-संध्याकाळी 4.33 वाजता
कल्याण जं- संध्याकाळी 4.51 वाजता
पुणे जं- संध्याकाळी 7.10 वाजता
कुर्डुवाडी-रात्री 9.28 वाजता
सोलापूर- 10.40 वाजता

सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत ट्रेन सोलापूरहून सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी सुटते. ही ट्रेन कुर्डुवाडी, पुणे, कल्याण, ठाणे आणि दादर या स्थानकांत थांबते. तर, दुपारी 12 वाजता 35 मिनिटांनी मुंबई सीएसएमटीला पोहोचते.

या गाडीला असलेले थांबे

कुर्डुवाडी-सकाळी 6.53 ला पोहोचते
पुणे-सकाळी 9.15 ला पोहोचते
कल्याण- सकाळी 11.50 ला पोहोचते
ठाणे-सकाळी 11.50 ला पोहोचते
दादर-दुपारी 12.12 ला पोहोचते
सीएसएमटी-दुपारी 12.35 पोहोचते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *