रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या नागोठणे शहरात असणाऱ्या जैन देरासर येथे 23 वर्षीय पुजारीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना काल मंगळवारी रोजी दुपारी उघडकीस आली आहे. जैन धर्मीय यांच्या धार्मिक स्थळी घडलेल्या या घटनेमुळे नागोठणे शहरासहीत जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची फिर्याद त्याची पत्नी यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहा तालुक्यातील नागोठणे येथील जैन देरासर मध्ये मयुरकुमार महेशभाई राठवा (वय 23, सध्या रा. आराधना भवन, तिसरा मजला, बाजार नागोठणे, तालुका रोहा, जिल्हा रायगड) (मूळ रा. बालपरी, ता. माकणी, जि. छोटा उदयपूर, गुजरात राज्य) काही दिवसापूर्वीच ते नागोठणे येथील जैन देरासर येथे पुजारी म्हणून कार्यरत झाले होते.
