वादळामुळे कोकणातील समुद्र खवळला, 2 बोटी भरकटल्या, 32 खलाशी बेपत्ता

मच्छीमार व त्यांच्या कुटुंबीयांवर चिंतेचे सावट पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ‘मोंथा’चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. येत्या दोन दिवसांत दरम्यान उच्च ते मध्यम चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, हा इशारा मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना लागू आहे. उत्तर महाराष्ट्र किनाऱ्यावर 45-55 किमी प्रतितास वेगाने आणि 65 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या तीव्रतेनुसार वाऱ्याचा वेग वाढू शकतो. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची तसेच उत्तर कोकणातील सखल भागात पूर येण्याची शक्यता वर्तवली आहे.

दोन मच्छीमार बोटी भरकटल्या

अरबी समुद्रातील वादळात सहा बोटींपैकी चार परतल्या असून न्हावा-पनवेल येथील दोन मच्छीमार बोटी भरकटून मंगळवारी बेपत्ता झाल्या. या दोन बोटींवरील सुमारे 32 खलाशांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मच्छीमार व त्यांच्या कुटुंबीयांवर चिंतेचे सावट पसरले आहे. यासह इतर ठिकाणच्या आणखी काही बोटी भरकटल्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक बोटी किनाऱ्यावर नांगर टाकून उभ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *