‘मी तुला सोडणार नाही’, 17 वर्षीय तरूणाचा गर्लफ्रेंडसोबत वाद; रागाच्या भरात केले असे काही…

कपूरबावडी परिसरातील धक्कादायक घटनेत 17 वर्षीय मुलाने आपल्या अल्पवयीन मैत्रिणीला जिवंत पेटवून दिल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 17 वर्षीय पीडित मुलगी सुमारे 80 टक्के भाजले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काय आहे प्रकरण?

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी सध्या कपूरबावडी परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहते. ती यापूर्वी चेंबूर येथे राहत होती, तेथेच तिची आरोपी मुलाशी ओळख झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाली आणि ती ठाण्यात स्थलांतर केल्यानंतरही त्यांचा संपर्क कायम होता.

घरात एकटी असताना पेटवले

24 ऑक्टोबर रोजी ती घरात एकटी असताना शेजाऱ्यांना घरातून धूर येताना दिसला. त्यांनी तातडीने तिच्या आईला कळवले. कुटुंबीय घरी पोहोचले असता, घरात आरोपी मुलगा असल्याचे दिसले, तर मुलगी आगीच्या ज्वाळेत झगडत होती. तत्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार झाला. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला नंतर ताब्यात घेतले.

या प्रकरणी कपूरबावडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत ‘गंभीर दुखापत घडविणे’ आणि ‘प्रेरणा देणे’ या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

पोलिस निरिक्षक निलंबित

दरम्यान, आणखी एका घटनेत, नालासोपारा (पेल्हार) येथील मोठ्या मेफेड्रोन (एमडी) उत्पादन कारखान्याचा मुंबई पोलिसांनी भांडाफोड केल्यानंतर केवळ तीन दिवसांनी मीरा-भाईंदर-वसई-विरार (एमबीव्हीव्ही) पोलिस आयुक्तांनी पेल्हार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वानकोटी यांना निलंबित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *