बॉयफ्रेंडच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुंबईतील तरुणीने प्राण सोडले; एका शंकेनं घेतला दोघांचा जीव

प्रियकराने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुंबईतील तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मनिषा यादव असं मृत तरुणीचं नाव आहे. आज सकाळच्या सुमारास मनिषा हिच्यावर तिचा प्रियकर सोनू बराय याने हल्ला केला होता. मनिषावर हल्ला केल्यानंतर सोनूने स्वत:चं जीवन संपवलं होतं. गंभीर जखमी झालेल्या मनिषाला जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने मनिषाची प्राणज्योत मालवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील लालबाग काळाचौकी परिसरात मनिषा यादव हिला सोनू बराय याने रस्त्यात बेदम मारहाण करून तिच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मनिषा जवळच असलेल्या आस्था नर्सिग होममध्ये गेली. मात्र सोनू याने नर्सिंग होममध्ये घुसून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि नंतर स्वतःचाही गळा चिरला. या घटनेनंतर या दोघांना तात्काळ केईएम रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. परंतु तिथे तपासून डॉक्टरांनी सोनू बराय याला मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *