बिथरलेल्या बैलाने दिलेल्या धडकेत ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी कर्जतनजीकच्या गावात घडली. गेल्या दोन दिवसांत या बैलाने अनेकांवर हल्ले केले. त्यात एका लहान मुलासह दोन महिला जखमी झाल्या. एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.

बैलाला पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांनी खोपोली येथील सामाजिक संघटनेच्या बचाव पथकाला पाचारण केले. बैलाला पकडण्यात आले असल्याचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी सांगितले. बैलाच्या हल्ल्यात दोन दिवसांत पाच जण जखमी झाल्याचे माजी नगरसेवक संकेत भासे यांनी सांगितले.
तर दुसरीकडे, अक्सा समुद्रात एक जणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मालाडच्या अक्सा समुद्रात चार जण बुधवारी सायंकाळी ५.१५ वाजता पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी लाटांमुळे सर्वजण गटांगळ्या खाऊ लागले. यातील तीन जण सुखरूप बाहेर पडले. तर १३ वर्षीय मयांक बेपत्ता झाला. त्याचा शोध सुरू करण्यात आला, मात्र त्याचा मृतदेह हाती लागला.