पुण्यात विकृतीचा कळस, भटक्या कुत्र्यासोबत तरुणाने केले अनैसर्गिक कृत्य; व्हिडिओत दिसलं भयंकर दृष्य

राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरात एक संतापजनक प्रकार घडला आहे. विद्येचे माहेरघर असणारे पुणे हे क्राईम कॅपिटल बनत चालले आहे. एकीकडे गुन्हेगारीचा विळखा पुणे शहराला बसत असताना दुसरीकडे पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात विकृतीचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. शहरातील वडारवाडी परिसरात क्रौर्याची संतापजनक घटना घडली असून एका व्यक्तीने भटक्या कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव श्यामराव धोत्रे असं आहे. या प्रकरणी प्राणीप्रेमी संजय शिंदे (वय 59, रा. मॉडेल कॉलनी, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. शिंदे आणि त्यांचा स्वयंसेवकांचा गट हा परिसरातील भटक्या प्राण्यांच्या खाण्या-पिण्याची आणि उपचारांची जबाबदारी घेतो. काही दिवसांपासून त्यांच्याकडे येणारा एक कुत्रा अचानक गायब झाल्याने त्यांनी चौकशी सुरू केली. त्यावेळी परिसरातील रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीवरून आणि एका व्हिडिओच्या आधारे, त्या कुत्र्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *