संध्याकाळनंतर गावात रडण्यास बंदी, कोकणातील हे गाव कोणतं? फास्ट जगात आजही जपली जातेय अनोख प्रथा

महाराष्ट्रातील प्रत्येक गावा-गावांत विविध प्रथा, परंपरा असतात. पण सर्वसाधारणपणे राज्यभरातील जवळपास प्रत्येक घरात एक नियम सारखाच असतो, तो म्हणजे संध्याकाळी घराघरात दिवे लावले जातात. तसंच संध्याकाळच्या वेळी काही घरांमध्ये काही गोष्टींचं काटेकोर पालन केलं जातं. महाराष्ट्रात असंच एक गाव जे एका संध्याकाळच्या एका खास प्रथेसाठी ओळखलं जातं. गावातील लोकांना संध्याकाळ झाल्यानंतर रडण्यास मनाई आहे. म्हणजेच संध्याकाळी दिवेलागणीपासून नंतर संपूर्ण रात्रभर, सकाळी होईपर्यंत गावातील कोणीही रडू शकत नाही. हे वाचून विचित्र वाटत असलं, तर राज्यातील या गावात ही प्रथा काटेकोरपणे पाळली जाते.

कोकणातील गावात संध्याकाळपासून रडण्यास बंदी

संध्याकाळी रडण्यास बंदी असलेलं हे गाव आहे कोकणातील सिंधुदुर्गातील श्रावणगाव. या गावात अनोखी परंपरा आहे. संध्याकाळी न रडण्यामागे एक खास गोष्ट आहे. या गावाची ग्रामदेवता हिंसाचाराविरोधात आहे. त्यामुळेच या गावात भाडणं करणं मान्य नाही. तसंच गावातील लोक पूर्णपणे शाहाकारी आहेत. शिवाय संध्याकाळपासून कोणीही गावात रडलं, तर ग्रामदेवता क्रोधीत होऊन शाप देते असं मानलं जातं. गावातील एखाद्या घरात भांडणाचा, रडण्याचा आवाज आला, तर त्या घरातील सदस्यांना ज्येष्ठ लोकांसमोर भांडणाचं, रडण्याचं कारण, स्पष्टीकरण द्यावं लागतं.

गावाने आजही जपली आहे जुनी परंपरा

आज टेक्नोलॉजीच्या काळातही कोकणातलं हे गाव त्यांची जुनी परंपरा जपून आहेत. त्यांनी जपलेल्या परंपरेमुळेच त्यांच्या गावावर येणारी कोणतीही संकटं किंवा आपत्ती टाळली जात असल्याची त्यांची श्रद्धा आहे. या परंपरेमुळे राज्यभरात या गावाची खास ओळख आहे.

गावाची खास ओळख

कोकणातील या श्रावणगावाची आणखी एक खास ओळख आहे. या गावात एक तलाव आहे. याच तलावात श्रावणकुमारचा मृत्यू झाल्याचं बोललं जातं. श्रावणकुमार त्यांच्या आई-वडिलांसाठी पाणी आणण्यासाठी तलाव गेले असताना त्यांना दशरथ राजाने मारलेला धनुष्यबाण लागला आणि बाण डोळ्यात लागल्याने तलावातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *