इंस्टाग्रामवर प्रेम, बॉयफ्रेंड अन् मैत्रिणीच्या मदतीने पतीला संपवलं; 19 वर्षीय पत्नीच्या कारनाम्याने रायगड हादरलं

रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात एक थरकाप उडवणारं खून प्रकरण समोर आलं आहे. सोशल मीडियावर सुरू झालेलं हे प्रेम अखेर रक्तरंजित वळणावर जाऊन संपलं आहे. पत्नीनेच आपल्या प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाने रायगड जिल्हा हादरला आहे.

मृत तरुणाचे नाव कृष्णा नामदेव खंडवी (वय 23, रा. गौळवाडी, पाबळ, पेण) असे असून त्याचा खून पत्नी दिपाली अशोक निरगुडे (19), प्रियकर उमेश सदु महाकाळ (21) आणि मैत्रीण सुप्रिया चौधरी (19) यांनी संगनमत करून केला आहे. या तिघांना नागोठणे पोलिसांनी केवळ 24 तासांत गाठून अटक केली आहे.
दिपालीचे पती कृष्णाशी संबंध ताणलेले होते. काही महिन्यांपूर्वी तिची ओळख सोशल मीडियावर उमेश महाकाळ या तरुणाशी झाली. हळूहळू या दोघांचे ‘इंस्टाग्राम प्रेम’ वाढत गेले आणि त्यांनी कृष्णाला संपवण्याचा कट रचला.
त्यासाठी “वारगुडे” या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करण्यात आले. या खात्यामार्फत कृष्णाशी संवाद साधून त्याला “मैत्रिणी”च्या नावाखाली जाळ्यात ओढण्यात आले. 10 ऑक्टोबर रोजी आरोपींनी कृष्णाला नागोठणे एस.टी. स्टँडवर बोलावले. त्यानंतर त्याचे अपहरण करून वासगावच्या जंगलात नेण्यात आले. तिथे त्याला ओढणीने गळा आवळून ठार मारण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *