एकुलत्या एक लेकाचा दुबईत मृत्यू, शेतमजूर एकुलत्या एक लेकाचा दुबईत मृत्यू, शेतमजूर आई-वडिलांना 3 दिवसांनी कळालं; मुख्यमंत्र्यांपर्यंत मेसेज पोहोचला आणि…आई-वडिलांना 3 दिवसांनी कळालं; मुख्यमंत्र्यांपर्यंत मेसेज पोहोचला आणि…

दुबईत निधन झालेल्या 27 वर्षीय श्याम अंगरवार याचे पार्थिव परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीपासून दुबईपर्यंत सर्व सूत्रे हलवली. केवळ एका एसएमएसने प्रेरित होऊन त्यांनी दाखविलेली तत्परता आणि मानवता यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतमजूर दांपत्याच्या वेदनेवर फुंकर घातली. या घटनेने प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे.

काय आहे नेमकी घटना?

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आप्पाराव पेठ गावातील शेतमजूर दांपत्य राहतं. त्यांचा एकुलता एक 27 वर्षांचा मुलगा श्याम अंगरवार दुबईत कामाच्या शोधात गेला होता. तो इमाद नावाच्या कंपनीत नोकरी करत होता.  श्यामला दुसरी संधी मिळाल्याने त्याने नोकरी सोडली. 25 सप्टेंबरला त्याने वाढदिवस साजरा केला. मात्र काही दिवसांतच त्याला तापाची लक्षणे दिसू लागली. यानंतर त्याला एनएमसी रॉयल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान श्यामचा 1 ऑक्टोबरला मृत्यू झाला. मात्र ही दुखद बातमी आई-वडिलांना तीन दिवसांनी म्हणजेच 4 ऑक्टोबरला कळली. ज्यानंतर ते हतबल झाले.

मुख्यमंत्र्यांना एसएमएस

अचानक कोसळलेल्या या आपत्तीने दांपत्याला आधार कोणता शोधावा हे कळेना. अखेर, स्थानिक नेते गोवर्धन मुंडे यांनी या घटनेची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना पोहोचवली. 5 ऑक्टोबरला मुंडे यांनी फडणवीस यांना एका संदेशाद्वारे मदतीची विनंती केली. या साध्या एसएमएसने मुख्यमंत्री हेलावले आणि त्यांनी तात्काळ कारवाई सुरू केली.

दिल्ली ते दुबई सुत्र हलली

फडणवीस यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी थेट संपर्क साधला. मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सतत पाठपुरावा केला. पार्थिव भारतात आणण्याचा खर्च स्वतः उचलण्याची तयारी दाखवत त्यांनी केंद्रीय मंत्रालयाला विनंती केली. शेवटी, परराष्ट्र मंत्रालयाने हा खर्च स्वीकारला. या संपूर्ण प्रक्रियेत फडणवीस यांची संवेदनशीलता आणि जलद निर्णयक्षमता प्रत्यक्षात आली.12 ऑक्टोबरच्या मध्यरात्री श्याम यांचे पार्थिव दुबईहून हैद्राबाद विमानतळावर पोहोचले. नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ व्यवस्था केली आणि पार्थिव किनवटपर्यंत सुरक्षित नेले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या, ज्यामुळे दांपत्याला वेळीच मुलाचे दर्शन घेता आले. 12 ऑक्टोबरला किनवट येथे श्यामवर अंत्यसंस्कार पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *