पुण्यात आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली नको ते उद्योग; पोलिसांनी धाड टाकताच धक्कादायक प्रकार उघड, 6 तरुणी…

पुण्यात अवैध धंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर आता पोलिसांकडून शहरात जोरदार कारवाई सुरू आहे. अशातच मार्केटयार्ड परिसरातील गुलमोहर सोसायटीमध्ये सुरू असलेल्या वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटरवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध पथकाने नुकताच छापा टाकला. यावेळी अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला असून आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली हा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत सहा तरुणींची सुटका करण्यात आली असून, हे मसाज सेंटर चालवणाऱ्या महिला मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध पथकाकडून ही धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांना मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर स्वारगेट पोलिस ठाण्याच्या मदतीने संयुक्त पथक तयार करण्यात आले. त्यानंतर अचानक छापा टाकत अवैध धंदा उघडकीस आणण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *