मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि उपनगरीय रेल्वे विभागांकडून साधारणत: रविवारी रेल्वेमार्गांवर टप्प्याटप्प्यानं मेगाब्लॉक घेतला जातो. काही तांत्रिक आणि दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येतो. ब्लॉकदरम्यान लोकल सेवांचा वेग आणि दोन लोकलमध्ये असणारा वेळ वाढल्या कारणानं प्रवाशांची मोठी गैरसोय होते. अशीच काहीशी गैरसोय एक नव्हे तर तब्बल चार दिवस होणार आहे. ज्यासाठी मध्य रेल्वे विभागानं नागरिकांना आधीच माहिती देत पूर्वसूचित केलं आहे.
मध्य रेल्वेची ब्लॉक मालिका?
मध्य रेल्वेमार्गावरील कर्जत स्थानकावर कर्जत यार्ड रीमॉडेलिंगच्या कामाची पूर्वतयारी करण्यासाठी, 18, 22, 23, 24 सप्टेंबर या चार दिवसांदरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळं कर्जत ते खोपोली त्यासोबतच नेरळ ते खोपोली लोकल सेवा रद्द करण्यात येतील. ब्लॉक काळात ओव्हर हेड वायरच्या कामांसोबत पोर्टल उभारणी, पाडकाम, अँकर शिफ्टिंग, लोड ट्रान्सफर आणि नवीन क्रॉसिंग पॉइंट्सची कामं केली जाणार आहे. ज्यामुळं लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम होणार असून या ठिकाणांहून मुंबईच्या दिशेनं दैनंदिन स्वरुपात प्रवास करणाऱ्यांचाही खोळंबा होणार आहे.
काय आहेत ब्लॉकच्या वेळा?
18 सप्टेंबर- सकाळी 11 ते दुपारी 1.30 दरम्यान पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. यादरम्यान कालावधीत लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कोइम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस सकाळी 11.30 ते दुपारी 1.05 पर्यंत लोणावळ्यातच थांबवण्यात येईल. चेन्नई-अहमदाबाद हमसफर एक्स्प्रेस आणि चेन्नई-एलटीटी अतिजलद एक्स्प्रेस या गाड्यांना पुणे विभागात थांबा दिला जाईल. दुपारी 1.10 नंतर लोणावळ्यातून रेल्वे पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होतील. दरम्यानच्या काळात नेरळ ते खोपोली स्थानकांदरम्यान लोकल सेवाही रद्द राहील.
डाऊन लोकल वर परिणाम
- दुपारी 12 वाजता खोपोलीहून कर्जतला जाणारी लोकल रद्द
- दुपारी 1.15 ची खोपोलीहून कर्जतला जाणारी लोकल रद्द
अप लोकल
- सकाळी 11.20 वाजता खोपोलीहून निघून कर्जतला जाणारी लोकल रद्द
- दुपारी 12.40 वाजता खोपोलीहून कर्जतला जाणारी लोकल रद्द
दरम्यान, सीएसएमटीहून सकाळी 9.30 ते सकाळी 11.14 पर्यंत कर्जतला जाणाऱ्या लोकल नेरळपर्यंत चालवण्यात येतील आणि या लोकल नेरळ ते कर्जत दरम्यान रद्द राहतील याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. तर, कर्जतमधून सकाळी 11.19 ते दुपारी 1 पर्यंत सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकल नेरळहून सुटतील. या लोकल कर्जत ते नेरळ दरम्यान रद्द असतील.
22 सप्टेंबर : दुपारी 12.25 ते 1.55 वाजेपर्यंत कर्जत अप मार्गिकेवर (यार्डसह) ब्लॉक असेल. यादरम्यान कर्जत ते खोपोली स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध नसतील.
डाऊन लोकल
- दुपारी 1.15 वाजता कर्जतहून खोपोलीला जाणारी लोकल रद्द
अप लोकल
दुपारी 12.40 ची खोपोलीहून कर्जतला जाणारी लोकल रद्द
23 सप्टेंबर : (अप यार्डसह) सकाळी 11.20 ते दुपारी 1.50 दरम्यान ब्लॉक असून, दरम्यानच्या काळात नेरळ ते खोपोली स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
डाऊन लोकल
- दुपारी 12 वाजता कर्जतहून खोपोलीला जाणारी लोकल रद्द
- दुपारी 1.15 ची कर्जतहून खोपोलीला जाणारी लोकल रद्द
अप लोकल
- सकाळी 11.20 ची खोपोलीहून कर्जतला जाणारी लोकल रद्द
- दुपारी 12.40 ला खोपोलीहून कर्जतला जाणारी लोकल रद्द
24 सप्टेंबर : सकाळी 1120 ते दुपारी 1.20 आणि दुपारी 1.20 ते दुपारी 3.20 पर्यंत अप, डाऊन आणि मध्य मार्गावर ब्लॉक असल्यानं त्यादरम्यानच्या काळात नेरळ ते खोपोली रेल्वेसेवा उपलब्ध नसतील.
