नर्तिकेवर जीव जडला अन् गेवराईचा उपसरपंचाने तिच्या गावात जाऊन..

सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि त्यानंतर निर्घृण हत्या प्रकरण ताज्य असताना बीड पुन्हा एका धक्कादायक घटनेने हादरलंय. बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखा मसला येथील उपसरपंचाचा डोक्यात गोळी लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 5 सप्टेंबर 2025 समोर आलीय. गोविंद जगन्नाथ बर्गे यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

त्या नर्तिकेमुळे गोविंदने…

मिळालेल्या माहितीनुसार सदर गोविंद बर्गे याचं वैराग जवळील सासुरे येथील एका नर्तिकेसोबत प्रेम प्रकरण होते. गेवराई तालुक्यातील गोविंद जगन्नाथ बर्गे हे प्लॉटिंगचे व्यवसाय करत होते. या व्यवसात त्यांचा हळूहळू चांगला जम बसायला लागला होता. त्यानंतर काही काळात हा व्यवसाय करत असताना त्यांची ओळख पारगाव कलाकेंद्रातील नर्तिकेशी झाली. त्यानंतर ही ओळख जवळीकमध्ये वाढत गेली आणि या ओळखीचे रुपांतर प्रेमात झालं. प्रेमात असताना गोविंद यांनी नर्तिकेला सोन्याच्या नाण्यांसह अनेक महागड्या भेटवस्तू दिल्यात. एवढंच नाही तर त्यांनी काही दिवसांपूर्वी पावणे दोन लाखांचा एक मोबाईल तिला दिला होता. सगळं सुरुळीत चालत असताना अचानाक गेल्या चार पाच दिवसांपासून त्यांच्यामध्ये भांडणं सुरु झाली होती.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गोविंद हा नर्तिकेच्या गावी गेला होता. तिथे सासुरे गावातील परिसरात एका काळ्या रंगाच्या गाडीत त्याचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी या गाडीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे त्यांना काळ्या रंगाच्या गाडीत मृतावस्थेत गोविंद आढळून आला. तपास केल्यानंतर या मृतदेहाची ओळख पटली. पोलिसांनी गाडीची झाडाझडती घेतल्यानंतर तिथे त्यांना एक पिस्तूल देखील आढळली आहे. जी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याच पिस्तुलीनेच गोविंदचा डोक्यात गोळी लागली आहे. पण गोविंदने आत्महत्या केली की हत्याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *