गणेशोत्सव या सणाला राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आला आहे. या काळातील सर्व बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात. अमित ठाकरे यांनी याबाबत आशिष शेलांरांची भेट देखील घेतली होती. याबाबत शासनाने काय आदेश काढला आहे.
राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सव काळातील सर्व परीक्षा सर्व बोर्डाच्या रद्द करण्यात याव्या, अमित ठाकरे यांनी मागणी केली होती. यानंतर शासनाने गणेशोत्सव काळात परीक्षा घेण्यात येऊ नये तसेच पुनर्नियोजित कराव्या या संदर्भातला आदेश काढला आहे.
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा
आशिष शेलार यांनी पावसाळी अधिवेशनात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा जाहीर केला. त्यानंतरही राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांनी या कालावधीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे या शाळांवर कारवाई करावी आणि सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी अमित यांनी शेलार यांची वांद्रे येथील कार्यालयात भेट घेऊन केली. यावेळी मनविसेचे शिष्टमंडळ अमित त्यांच्या सोबत होते. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा त्यांनी नंतर पत्रकार परिषदेत केला.
