36 लाखांच्या हुंड्यासाठी पत्नीला मुलांसमोरच जिवंत जाळलं; घटना कॅमेरात कैद! पतीला पोलिसांनी घातली गोळी

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने 36 लाखांच्या हुंड्यासाठी आपल्या पत्नीला जिवंत जाळल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात घडली असून हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने पतीने विवाहित महिलेची निर्घृण हत्या करत तिला जाळून टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. मृत महिलेची ओळख निक्की अशी असून तिचा विवाह डिसेंबर 2016 मध्ये विपिन नावाच्या व्यक्तीबरोबर झाला होता. दरम्यान, या घटनेनंतर ग्रेटर नोएडामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

बहिणही त्याच घरात दिलीये

या महिलेला तिच्या पती आणि सासरच्यांनीही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच याच महिलेची मोठी बहीणही त्याच कुटुंबात विवाहित असून तिने आरोप केला आहे की, त्या दोघींनाही हुंड्यासाठी छळलं जात होतं. सासरच्या कुटुंबीयांनी 36 लाख रुपये मागितले होते असा आरोप केला आहे.  तसेच निक्कीला जिंवत जाळल्याचा व्हिडियो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लहान मुलांसमोरच पत्नीला पेटवून दिलं

धक्कादायक बाब म्हणजे घरातील लहान मुलांसमोरच विपिनने पत्नी निक्कीला जाळलं. अंगावर आगीच्या ज्वाला असतानाच स्वत:ला वाचवण्यासाठी जिन्यावरुन खालच्या दिशेला पळत असणाऱ्या निक्कीचा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त करत आरोपी विपिनला लवकरात लवकर फासावर चढवण्याची मागणी केली आहे.

आरोपीला अटक आणि एन्काऊंटर

या प्रकरणामध्ये आरोपी विपिनला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. मात्र अटक केल्यानंतर त्याला मेडिकल चाचणीसाठी घेऊन जात असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. या एन्काऊंटरमध्ये विपिनच्या पायला गोळी लागून तो जखमी झाला. पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेत आता उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *