दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बस ड्रायव्हरने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगावातून समोर आली आहे. पालक विश्वासाने ज्याच्यासोबत लेकीला शाळेत पाठवत होते, त्यानेच घात केल्याने पालक धास्तावले आहेत. अबिद हुसेन शेख जलील, राहणार शेंदुर्णी, असे 38 वर्षीय आरोपी बस चालकाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मला तू आवडतेस, असं सांगत आरोपी तिचा पाठलाग करत असे, तसंच फोनवरुन तिला अश्लील शिवीगाळही करत असल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
पालक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी स्कूल बसचा आधार घेतात, ड्रायव्हरवर विश्वास ठेवतात, मात्र हाच स्कूल बसचा ड्रायव्हर विश्वासघातकी निघाला. अबिद हुसेन शेख जलील, वय 38, राहणार शेंदुर्णी, याने त्याच्याच बसमधील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. या नराधमाच्या विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पाचोरा न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.