आजीसोबत बाहेरगावी गेलेला नातू आपल्या गावात आला, आजी रिक्षातून उतरायच्या आधीच घाईगडबडीने रिक्षातून उतरून पळू लागला. तेवढ्यात भरधाव आलेल्या टेम्पोची जोरदार धडक बसली आणि त्यात पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. रस्ता ओलांडताना पुन्हा एकदा बारामती तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत गुणवडी गावातील पाच वर्षीय आयुष निलेश लोंढे या चिमुकल्याचा मृत्यू झाला. आज संध्याकाळच्या वेळी बारामती डोर्लेवाडी रस्त्यावर गुणवडी गावच्या हद्दीत ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षीय आयुष हा त्याच्या आजीसोबत बाहेरगावी गेला होता. आज शुक्रवारी बाहेरगावाहून आजी आणि नातू दोघेही गुणवडीकडे आले. एका रिक्षाद्वारे गुणवडीकडे पोहोचताना आजी रिक्षातून उतरण्यापूर्वीच कधी एकदा घरी जातो असं झालेल्या आयुष हा आजी रिक्षातून उतरण्यापूर्वीच स्वतः रिक्षातून उतरत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी बारामती बाजूकडून डोर्लेवाडीकडे निघालेल्या टेम्पोची त्याला जोरदार धडक बसली.
रस्ता ओलांडताना टेम्पोने दिलेल्या धडकेत आयुष या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना बारामती-डोर्लेवाडी रस्त्यावर गुणवडी गावच्या हद्दीत घडली. या धडकेत त्याचा मृत्यू झाला. पाच वर्षाच्या चिमुकल्याचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. दरम्यान, या घटनेनं काही काळ इथे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. बारामतीत गेल्या दीड महिन्यात रस्त्यावरील अपघाताचा हा चौथा बळी ठरला. बारामतीत ओंकार आचार्य व त्याच्या दोन मुलींचा मृत्यू झाल्यानंतर बारामती शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आले. मात्र, रस्त्यावरील वाहतुकीत वाहनांचा वेग अजूनही तसाच राहिला आहे. त्या वेगाचा आज चौथा बळी गेला.
इंदापूर तालुक्यामधील वडापुरी गावातील दोन जिवलग मित्रांचा कुर्डूवाडी-टेंभुर्णी रस्त्यावर पिंपळनेरजवळ कालव्यात चारचाकी वाहन कोसळून झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. मृतांची नावे शंकर उत्तम बंडगर (वय ४४) आणि अनिल हनुमंत जगताप (वय ५५) अशी आहेत. ही दुर्दैवी घटना काल गुरुवारी घडली, ज्यामुळे वडापुरी गावात शोककळा पसरली आहे.
या घटनेनं वडापुरी गावात हळहळ व्यक्त होत असून, गावकऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवत शोक व्यक्त केला. तिघेही जिवलग मित्र असल्याने त्यांच्या निधनाने गावावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे.