परभणीला पावसाने झोडपलं, नद्यांना पूर, येलदरी धरणाचे दहा दरवाजे उघडले, अलर्ट जारी

मागील चार दिवसांपासून परभणी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळेच परभणी जिल्ह्यातील प्रमुख तीन नद्यांना पूर आला आहे. गोदावरी पूर्णा आणि दुधना नदी दुधडी भरून वाहत आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यांमध्ये प्रमुख दोन धरणं आहेत. त्या येलदरी आणि लोअर दुधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे येलदरी धरणाचे दहा दरवाजे उघडले असून तब्बल 56 हजार किंवा पाणी सोडण्यात आले आहे तर दुसरीकडे लोअर दुधना धरणातून 2600 ने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीपाचे पिकाचे नुकसान होत आहे आणि त्यामुळेच जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले असून पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत आणि तात्काळ पंचनामे करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कभी खुशी कभी गमचा माहोल आहे एकीकडे चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी खुश असला तरी असाच पाऊस पडत राहिला तर खरिपाच्या पिकाचे नुकसान होणार आहे त्यामुळे कुठेतरी तो अहवाल दिला असल्याचे दिसून येत आहे.

परभणी जिल्ह्यात आत्तापर्यंत 474 मिलिमीटर पावसाची नोंद

परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षी सरासरी 761 मिलिमीटर पाऊस पडत असतो. त्याच्या तुलनेत आत्तापर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये तब्बल 474 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. एकूण सरासरीच्या 62.4% एवढा पाऊस परभणी जिल्ह्यामध्ये झाला आहे. परभणी जिल्हा जून आणि जुलै या दोन महिन्यांमध्ये ३०७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती जो 84.3% एवढा पाऊस झाला होता. तुलनेने ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. ऑगस्ट महिना अद्याप संपलेला नसला तरी आत्तापर्यंत एका महिन्यात 167 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 126 टक्के पाऊस झाला आहे. मागील बारा तासात परभणी जिल्ह्यातील जवळपास 12 मंडळामध्ये अतिवृष्टी जाहीर करण्यात आली आहे. जून आणि जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *