नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गंत (NMMT) महिला प्रवाशांसाठी मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे अटल सेतू मार्गावरुन महिलांकरिता विशेष एसी बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. 14 ऑगस्टपासून या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळं आता महिलांचा गर्दीतून प्रवास करणे टळणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन एनएमएमटी सध्या 70 बस मार्गावर सेवा चालवण्यात येतात. यात 24 सामान्य आणि 46 एसी बसचे मार्ग आहेत. सध्या एनएमएमटी मुंबई, बोरिवली, ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, दहिसर, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, खोपोली कर्जत, रसायनी आणि उरण यासारख्या मार्गावर चालवण्यात येतात. या मार्गांवर दररोज 2.27 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी 1 लाख महिला.
महिला प्रवाशांना अधिक मदत करण्यासाठी एनएमएमटी गुरुवार 14 ऑगस्ट 2025पासून अटल सेतू (MTHL) मार्गावर महिलांसाठी विशेष एसी बससेवा सुरू करण्यात येत आहे.
या मार्गावर सुरू होणार महिला विशेष सेवा
महिलांकरता बसमार्ग 116 आणि 117 वर महिला विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे.
मार्ग क्रमांक 116: नेरूळ बस स्थानक-वर्ल्ड ट्रेड सेंटर- सकाळी 08.05
वर्ल्ड ट्रेड सेंटर-नेरूळ बस स्थानक-संध्याकाळी 06.25
मार्ग क्रमांक 117 खारघर सेक्टर 35-वर्ल्ड ट्रेड सेंटर-सकाळी 8.00
वर्ल्ड ट्रेड सेंटर-खारघर सेक्टर 35-संध्याकाळी 6.50
महिला प्रवाशांनी या सेवाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे अवाहन परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. महिला विशेष बससेवा सुरू केल्याने महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.