मुंबईतील गोरेगावमधून धक्कादायक घटना समोर आले आहेत. आरे कॉलनीमधील ओबेरॉय स्क्वेअर कॉम्प्लेक्समध्ये एका 17 वर्षीय तरुणीने 23 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीने बेडरूममधून खिडकीतून उडी मारली. ही तरुणी एका मोठ्या रिअर इस्टेट डेव्हलपरची एकुलती एक मुलगी होती. पालकांनी सांगितल्यानुसार तरुणी अनेक दिवसांपासून नैराश्यात होती. त्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचले. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी दोन वर्षांपासून मानसिक तणावासाठी उपचार घेत होती.
शिक्षणासाठी लंडनला जाणार होती पण…
पालकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती तरुणी 15 दिवसांनंतर पुढील शिक्षणासाठी लंडनला जाणार होती, पण तिने 23 मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. ती तिच्या रुममध्ये कायम अभ्यास करत बसायची, असं पालकांनी पोलिसांना सांगितलं. घटनेच्या वेळी आई स्वयंपाकघरात होती, तर आजी आणि आजोबा त्यांच्या खोलीत होते. तर तिचे वडील हे कामानिमित्त बाहेर होते. ती अभ्यास करत असेल असंच सर्वांना वाटत होतं. अचानक अपार्टमेन्टच्या रिसेप्शनिस्टने तिला बिल्डिंगच्या 23 मजल्यावरून खाली पडताना पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती तिच्या घरच्यांना दिली.
पोलिसांना ही प्रथमदर्शनी मानसिक तणावच आत्महत्या करण्यामागचं मुख्य कारण वाटत आहे. पण गेल्या 8 महिन्यात या परिसरात आत्महत्याची ही चौथी घटना आहे. यापूर्वीही तीन विद्यार्थ्यांनी आपलं जीव संपवलं आहे. याच परिसरात 2 जुलै रोजी एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. संबंधित तरुणाला दीक्षांत समारंभासाठी जर्मनीला जाण्यासाठी प्रवासाचा परवाना मिळाला नव्हता. त्यामुळे त्याला एअरपोर्टवर प्रवेश दिला गेला नाही. त्यानंतर, तो विमानतळावरुन बाहेर पडल्यानंतर आधी जुहू बीचकडे गेला. त्याठिकाणी त्याने आपलं सगळं सामान सोडलं आणि नंतर आरे कॉलनीतील त्याच कॉम्प्लेक्सच्या 42 व्या मजल्यावरुन उडी मारुन त्याने आत्महत्या केली होती.