मुंबईसह ठाण्यात दहीहंडी उत्सवा मोठ्या थाट्यामाट्यात सुरु आहे. मुंबई आणि ठाण्यातील दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक शर्थीचे प्रयत्न करत आहे. जय जवान यंदा तरी 10 थर लावणार का याकडे लक्ष असताना कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर रचून विश्वविक्रम केला आहे. हा थरार अनुभव ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी सोहळ्यात पाहिला मिळाला.
गोविंदा रे गोपाळा…अशा घोषणा देत गोविंदा पथक उंच थर रचण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. मुंबई – ठाण्यातील लहान मोठी गोविंदा पथकं उंच थर लावण्यासाठी दरवर्षी मैदानात उतरतात. या थराचा बादशाह मुंबईतील पश्चिम उपनगरांमधील जोगेश्वरी जय जवान गोविंका पथकाच्या पथकं नऊ थर रचण्यात आघाडीवर आहेत. पण यंदा त्यांचा हा विक्रम कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर रचून मोडला आहे.
या विश्वविक्रमला गवसणी घालण्यासाठी प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानने त्यांना 25 लाखांचे बक्षिस देण्यात आलं आहे.
जय जवान गोविंदा पथकाने 2012 मध्ये ठाण्यात प्रथमच नऊ थर रचून विक्रम केला होता. त्यानंतर या पथकाने त्याचवर्षी ऑक्टोबरमध्ये स्पेनमधील पथकाच्या विक्रमाची बरोबरी केली होती. त्यानंतर या पथकाने साडे नऊ थर रचून आपलाच विक्रम मोडीत काढला. जय जवान गोविंदा पथकापाठोपाठ जोगेश्वरीतील आर्यन गोविंदा पथक आणि कोकण नगर गोविंदा पथक आणि अंधेरी (पूर्व) येथील मालपा डोंगरी, त्याचबरोबर सांताक्रुझमधील विघ्नहर्ता, बोरिवलीतील शिवसाई गोविंदा पथक नऊ थर रचण्यात आघाडीवर आहेत. यंदा कोकण नगर गोविंदा पथकाने ठाण्यात सर्वांना मागे टाकून 10 थर रचून विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
तर आर्यन्स गोविंदा पथकाने नऊ थर रचण्याचा पराक्रम केला. मुंबईतील प्रसिद्ध जय जवान गोविंद पथकाचा नऊ थर रचण्याचा पहिला प्रयत्न फसला. जय जवान गोविंदा पथकाने दादरमधील हिंदू कॉलनी येथे दहीहंडी रचली. यावेळी जय जवान मंडळाने चार एक्के लावले. चार एक्के लावणे ही जय जवानची खासियत आहे.