मांसाहार बंदीचा फज्जा, बेकायदेशीर आदेश मोडून विक्री, पालिकेसमोर कोंबड्या सोडत पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन

राज्यात आज अनेक पालिका क्षेत्रात मांसाहार बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान पालिकांच्या या निर्णयाला विरोध करत अनेक ठिकाणी मांसाहार विक्री करण्यात आल्याचं समोर आलं आहे. संविधानानं आम्हाला खाण्याचा आणि विक्री करण्याचा अधिकार दिल्याचं म्हणत खाटीक समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर कल्याण-डोंबिवली पालिकेसमोर देखील आंदोलन करण्यात आलं.

पवारांच्या राष्ट्रवादीचं KDMCसमोर कोंबड्या सोडत आंदोलन

मात्र, याच पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी चिकन सेंटर आणि हॉटेल्सवर मांसाहार मिळत असल्याचं समोर आलं. तसंच
कल्याण-डोंबिवली पालिकेसमोर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन करत पालिकेच्या निर्णयाचा निषेध नोंदवला.

दरम्यान नाशिक शहरात चिकन, मटण विक्रीची बंदी झुगारुन मटणाची दुकानं आणि कत्तलखाने सुरुच ठेवण्यात आली. नाशिक महापालिकेने आज शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवावेत असे लेखी आदेश दिले होते. मात्र मनपाचे या आदेश झुगारत शहरातील 800 पेक्षाही अधिक कत्तलखाने आणि मटन विक्री दुकाने सुरू ठेवण्यात आली होती.

‘मांसाहार बंदीचे आदेश सरकारनं काढले नाहीत’

दरम्यान सरकारनं मांसाहार बंद ठेवण्याचे आदेश काढलेले नाहीत. काय खायचं आणि काय खाऊ नये याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

15 ऑगस्टला मांसाहार विक्री बंद ठेवण्याच्या निर्णयावर सत्ताधाऱ्यांकडून वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. तर दुसरीकडे या निर्णयाला विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. एवढंच नव्हे तर अनेक पालिका क्षेत्रात मांसाहार बंदीच्या निर्णयाचा फज्जा देखील उडवण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *