रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधून घेतली आणि त्याच रात्री जिला रक्षा करण्याचं वचन दिलं त्याच चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केली. ही संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील बिधुना गावात ही घटना घडल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.
10 ऑगस्टला या मुलीच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली की त्यांच्या मुलीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. ही मुलगी 14 वर्षांची होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी संशयाच्या आधारे चुलत भावाला ताब्यात घेतलं, चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
मुलीच्या आईसोबतही संबंध
चुलत बहिणीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या चुलत भावाचे 10 वर्षांपूर्वी मुलीच्या आईशी संबंध होते. त्यावेळी मुलगी फक्त चार वर्षांची होती. आरोपी 33 वर्षांचा आहे. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की 2015 मध्ये तो 23 वर्षांचा असताना काकू आणि त्याच्यात संबंध निर्माण झाले, जे दोन वर्षे सुरु होते. एक दिवस काकांनी दोघांनाही रंगेहाथ पकडलं. त्यानंतर, कुटुंबातील सदस्यांनी दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी एकले नाहीत. यामुळे, आरोपीच्या कुटुंबाने 2017 मध्ये त्याचे लग्न इटावा जिल्ह्यातील एका मुलीशी लावून दिले. आरोपीला चार वर्षांची मुलगी आणि चार बहिणी आहेत.
मुलीच्या नखांमध्ये आणि हातात केस
शवविच्छेदनात मुलीच्या नखांमध्ये आणि हातावर केस आढळले. पोलिसांनी आरोपीच्या केसांशी ते जुळवण्यासाठी नमुने घेतले आहेत. हे नमुने झाशी येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आले. डीएनए चाचणी देखील केली जाईल. पोलिसांना विश्वास आहे की पुराव्याच्या आधारे पीडितेला न्याय मिळेल आणि गुन्हेगाराला शिक्षा होईल.
