विश्रांतीनंतर विदर्भात पुन्हा पावसाची उसंत; पुढील 3 दिवस धुव्वाधार पाऊस बरसणार

नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहेअशातच भारतीय हवामान खात्याने  नागपूर जिल्ह्यात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये काहो ठिकाणी वादळीवारा तसेच मेघगर्जना आणि पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. तर विदर्भातील  चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांच्या गडगडाटसह हलका ते मध्यम पाऊस (Rain Update) होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील मोठे व मध्यम स्वरूपाचे धरणे जवळपास 70% भरलं आहे. तर लघु प्रकल्प जवळपास 75% भरलेले आहेत. तर दुसरीकडे नदी आणि नाले यांना अतिवृष्टीमुळे चांगले प्रवाह झाले आहे.

यवतमाळ जिल्ह्याला दोन दिवस ऑरेंज अलर्टचा इशारा

हवामान विभागाने 14 ऑगस्टपर्यंत यवतमाळ जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. या काळात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नदी नाल्या काठवरील नागरिकांनी सतर्तता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कपाशी सोयाबीन या पिकांसाठी हा पाऊस नव संजीवनी देणारा ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *