तृतीयपंथी काजल आणि तिचा अल्पवयीन मामेभाऊ देव यांच्या हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. काजल आणि देव यांची गळा दाबून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. मात्र दोघांच्या मृत्यूला बराच काळ लोटल्यामुळे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गूढ उलगडलेले नाही. त्यांचा व्हिसेरा जतन करुन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे दोन दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस आला होता.
काजलला स्वतःला तृतीयपंथी म्हणवून घेणे आवडत नव्हते. म्हणूनच, तिने मुलगी होण्यासाठी मुंबईतील रुग्णालयात चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करुन घेतली होती. यासाठी तीन लाख रुपयांहून अधिक खर्च आला.
