‘माझ्या मुलाशी लग्न करायचं असेल तर माझ्याशीही S*x…’; विचित्र घटनेनं हिंगोली हादरली

हिंगोलीमध्ये एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. लग्नाचं आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला मध्य प्रदेशमधून बोलवून घेण्यात आलं. लवकरच आपण लग्न करु असं सांगून अल्पवयीन मुलाने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर या मुलाच्या वडिलांची नजर या अल्पवयीन मुलीवर पडली. सून करुन घेण्यासाठी ज्या मुलीला बोलावलं तिच्यासोबतच शरीरसंबंध ठेवण्याची मागणी या इसमाने केली. तुला माझ्या मुलाशी लग्न करायचं अशेल तर माझ्यासोबतही तुला शरीरसंबंध ठेवावे लागतील असं या इसमाने पीडितेला सांगितलं. एवढ्यावरच न थांबता या इसमाने मुलीवर अत्याचार केला. बाप-लेकाकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून अखेर या मुलीने पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी तिला या नराधमकांच्या तावडीतून सोडवलं असून त्यानंतरच हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आलाय.

कुठे आणि कशी झाले आरोपी व पीडितेची भेट?

पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये, पीडित तरुणी ही मध्य प्रदेशातील बैतूलची रहिवाशी आहे. ही तरुणी विप्ले  अॅप्लिकेशन वापरायची. याच माध्यमातून तिची ओळख हिंगोलीमधील आरोपी तरुणासोबत झाली. आरोपीही अल्पवयीन असल्याने या दोघांचे गप्पांचे विषय आणि इतर आवडीनिवडी जुळल्या आणि ते बोलू लागले. त्यावेळी ही तरुणी अवघ्या 15 वर्षांची असल्याचं आरोपीला समजलं. त्याने तिला लग्नाचं आमिष दाखवलं. तसेच तू इकडे निघून ये आपण हिंगोलीमध्ये एकत्र राहू असं सांगितलं. खरोखरच ही मुलगी या मुलाचं ऐकून हिंगोलीला पळून आली. मात्र हीच तिची मोठी चूक ठरली.

शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करत बापाकडून अमानुष छळ

हिंगोलीमध्ये आल्यानंतर या आरोपी मुलाने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. आपण लग्न करणारच आहोत तर त्यापूर्वी आपण शरीरसंबंध ठेऊयात असं सांगत त्याने तिला यासाठी राजी केलं. मात्र याचदरम्यान आरोपीच्या वडिलांचीही या मुलीवर नजर पडली. तुला माझ्या मुलाशी लग्न करायचं असेल तर माझ्यासोबतही तुला शरीरसंबंध ठेवावे लागतील असं या इसमाने 15 वर्षीय मुलीला सांगितलं. त्याने आपली मागणी मान्य करुन घेण्यासाठी आणि तिने शरीरसंबंध ठेवावेत म्हणून तो तिच्यावर दबाव टाकत होता. आपण पळून येऊन चूक केली याची जाणीव होण्यास या मुलीला उशीर झाला होता. आपल्यासोबत हे सारं का होत आहे असा प्रश्न तिला पडला. ती मनाने खचून गेली. तिने या बाप-लेकाकडे मला माझ्या घरी परत जाऊ द्या अशी मागणी केली. मात्र या दोघांनाही तिला जाऊ दिलं नाही.

पोलिसांपर्यंत कशी पोहोचली ही तरुणी?

अखेर एकदा हे दोघेही घरी नसताना तरुणीने हिंमत दाखवत पोलीस हेल्पलाईनला फोन करुन तिच्यासोबत घडलेला सर्व घटनाक्रम सांगत आपल्याला येथून सोडवण्याची विनंती केली. हिंगोली पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत तातडीने या आरोपींचं घर गाठलं आणि मुलीची सुटका केली. मुलीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आली असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या ही मुलगी हिंगोलीमध्येच असून पोलीस कारवाई आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतर तिला तिच्या मध्य प्रदेशमधील घरी पाठवलं जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *