मैदानावर सामना सुरु असताना कोणत्या प्राण्याने अचानक एंट्री घेणं ही काही नवी गोष्ट राहिली नाही. आतापर्यंत अनेकदा चालू सामन्यात कुत्रा, मांजर, साप असे अनेक प्राणी आलेले तुम्ही पाहिले असतील. पण पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानावर चक्क कोल्हा आल्याने सामना थांबवण्यात आला. एवढंच नाही तर मैदानात अचानक आलेला कोल्हा पाहून खेळाडूंची भंबेरी उडाली. ही घटना इंग्लंडची टी 20 लीग द हंड्रेडमध्ये झाली.
मैदानात आला कोल्हा :
6 ऑगस्ट रोजी लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर द हंड्रेड क्रिकेट लीगला सुरुवात झाली. ओव्हल इनविंसिबल्स आणि लंदन स्पिरिट यांच्यात ओपनिंग सामना खेळवला गेला. सामन्यानंतर एक कोल्हा अतिशय वेगाने मैदानात घुसला आणि इकडे तिकडे धावू लागला. त्यामुळे मैदानात काहीवेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोल्हा इतक्या वेगाने मैदानात घुसला की त्याला पाहून खेळाडू, प्रेक्षक, कॉमेंटेटर्स सर्वच खूप घाबरले.
मैदानातील हिरव्या गवतावर धावल्यावर कोल्हा काही वेळाने मैदानाच्या बाहेर गेला. स्टेडियममधील प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्या कोल्ह्याचं स्वागत केलं, पण मैदानातील खेळाडूंची मात्र भंबेरी उडाल्याचे दिसले. सदर घटना ही सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये घडली होती. जेव्हा यजमान लंडन स्पिरिटद्वारे देण्यात आलेल्या 81 धावांच्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी इनविंसिबल्स फलंदाजीसाठी मैदानात आले.
रशिद खान आणि सॅम करनने गोलंदाजीत चांगले प्रदर्शन केले, दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. यात डेविड वार्नर, केन विलियमसन आणि एश्टन टर्नर असे खेळाडू सामील होते. 11 धावा देऊन 3 बळी घेणारा आणि मन ऑफ द मॅच म्हणून निवडलेला रशिद खान सामन्यानंतर म्हणाला, ‘विजयाने सुरुवात करणे छान होते. मी गेल्या काही महिन्यांपासून गोलंदाजी केलेली नाही, परंतु गेल्या दहा वर्षांत मी जितके क्रिकेट खेळलो त्यामुळे खरोखरच मदत मिळत’.