महाराष्ट्र हादरला! आईने मोबाईल दिला नाही म्हणून 16 वर्षीय मुलाची दरीत उडी; उपचारापूर्वीच मृत्यू

अहिल्यानगरमध्ये मोबाईलच्या हट्टापायी एका 16 वर्षीय मुलाने प्राण गमावल्याची दुर्देवी घटना घडली आहे. आईने मोबाईल देण्यास नकार दिल्या या मुलाने थेट डोंगरकडावरुन खाली उडी घेत स्वत:ला संपवलं. हा सारा प्रकार आजूबाजूला अनेकजण असताना घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या प्रकरणामुळे मुलांना लागलेलं मोबाईलचं व्यसन हा विषय पुन्हा चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे.

नेमकी कुठे घडली ही घटना?

मोबाईल घेऊन दिला नाही, या कारणावरून 16 वर्षीय मुलाने थेट खवडा डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुणाचे नाव अथर्व गोपाल तायडे असं आहे. अर्थव हा मूळचा बुलढाण्या जिल्ह्यातील जळगाव जामोदचा रहिवासी आहे. सध्या अर्थव वाळूज येथील साजापूर शिवारातील स्वातिक सिटी येथे राहत होता. अथर्व हा सध्या पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *