’13 दिवस टॉर्चर, 17 वर्षे अपमान…’ मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष मुक्तता झालेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आहेत तरी कोण?

17 वर्षांपूर्वी नाशिकच्या मालेगाव इथं झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकार गुरुवारी एनआयएच्या विशेष न्यायालयानं जाहीर केला. जिथं साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित, सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर , सुधाकर द्विवेदी , सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी या सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल समोर आला. या निकालानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया समोर आलेल्या असतानाच काही नावं विशेष चर्चेत आली. त्यातलंच एक नाव म्हणजे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं.

न्यायालयाच्या निकालानंतर काय होती साध्वींची पहिली प्रतिक्रिया?

दरम्यान सदर प्रकरणात आपली निर्दोष मुक्तता झाल्यानंतर साध्वींनी माध्यमांशी संवाद साधताना आपण 17 वर्षे अपमान सहन केल्याचं म्हणत स्वतःच्या देशात आम्हाला आतंकवादी बनवण्यात आल्याची खेदजनक प्रतिक्रिया दिली. ‘मला 13 दिवस टॉर्चर करण्यात आलं. माझं आयुष्य उध्वस्त झालं. मी संन्यासा आहे म्हणून कदाचित मी जिवंत आहे, पण मी दररोज मरत होते. आज मात्र मला आनंद झाला आहे, कोण तरी आहे जो माझा आवाज ऐकत आहे…
हिंदुत्व आणि भगव्याचे आज विजय झाला आहे’, असं म्हणत त्यांनी निकालानंतर पहिली प्रतिक्रिया दिली.

माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्याविषयीच्या ‘या’ गोष्टी माहितीयेत? 

प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कोणते आरोप होते? 

मालेगावमधील बॉम्बस्फोट प्रकरणी स्फोटासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावावर होती असा दावा करमअयात आला होता याशिवा, त्यांच्यावर या कटात सक्रिय सहभाग, वाहन उपलब्ध करून दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र बचाव पक्षाच्या वकिलांच्या माहितीनुसार ती मोटारसायकल आधीच विकली असून चेसिस नंबर नोंदणीकृत नव्हता, ज्यामुळं साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर त्या कटामध्ये सहभागी नव्हत्या.

भोपाळमधून लोकसभेच्या निवडणुकीत विजय 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भोपाळ मतदारसंघातून सहभाग घेतला होता. या निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांचं आव्हान असतानाही पहिल्याच निवडणुकीत त्या 364,822 मतांनी खासदारकीची निवडणूक जिंकल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *