नाशिकच्या मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी आज न्यायालयात निकाल जाहीर करण्यात आला. तब्बल 17 वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागला आहे. कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
बॉम्बस्फोटात जे जखमी झालेत किंवा मृत्यू झालेत ते बॉम्ब स्फोटामुळेच झाले आहेत हे सरकारी पक्ष सिद्ध करु शकला आहे, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. मात्र स्फोटाच्या ठिकाणी सापडलेल्या दुचाकीमध्ये आरडीएक्स लावण्यात आले होते हे सरकारी वकिलांना सिद्ध करता आले नाही. मा्त्र बाईक प्रज्ञासिंह ठाकूरची होती, याचा कोणाताही पुरावा सापडला नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.