मुंबई हादरली! 35 वर्षीय शेजाऱ्याकडून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पार्किंग लॉटमध्ये घेऊन गेला अन्…

महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भातील मुद्दे आणि काही महत्त्वाचे प्रश्न सातत्यानं उपस्थित होत असतानाच प्रशासनाकडूनही कायदा अधिक कठोर करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू आहेत. मात्र तरीसुद्धा महिलांवरील अत्याचार आणि तत्सम घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अशाच एका घटनेनं मुंबईत शहर हादरलं असून, एका उच्चभ्रू वस्तीमध्ये ही घटना घडल्याची बाब समोर आली आहे.

35 वर्षीय शेजाऱ्याकडून 16 वर्षीय मुलीवर अत्याचार… 

मुंबईतील भायखळा इथं एका गगनचुंबी इमारतीतल राहणाऱ्या 35 वर्षीय आरोपीनं 16 वर्षांच्या मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार पीडितेच्या वडिलांनी आग्रीपाडा पोलीस स्थानकात दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी या FIR च्या धर्तीवर आरोपीला भायखळा परिसरातूनच अटक केली.

प्राथमिक माहितीनुसार आरोपी आणि पीडिता भायखळ्य़ातील एका उच्चभ्रू इमारतीतच राहत असून, आग्रीपाडा पोलिसांच्या माहितीनुसार पीडितेचं कुटुंब इमारीत 45 व्या मजल्यावर वास्तव्यास असून आरोपीचं घर 48  व्या मजल्यावर आहे. आरोपीच्या घरात आणि इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये हा गुन्हा घडल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी पुरावा म्हणून पोलिसांनी CCTV फुटेजचा आधार घेतला आहे. दरम्यान, तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आरोपीची यापूर्वीची कोणत्याही गुन्हेगारी कृत्याची नोंद नाही.

पार्किंग लॉटमध्ये नेलं आणि…

सदर प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर तपासाची सूत्र हलली आणि त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार  27 फेब्रुवारी आणि 28 जून रोजी गुन्हा घडला. या 35 वर्षीय आरोपीनं सुरुवाचीला पीडितेशी मैत्री केली आणि इमारतीच्याच पार्किंग लॉटमध्ये नेत तिच्यावर तिथं शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला. याव्यतिरिक्त एका प्रतिष्ठीत वृत्तसमुहाच्या माहितीनुसार आरोपीनं त्याच्या घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत पीडितेला घरी बोलवून लाऊंज रुममध्येही तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, त्या धर्तीवर POCSO कायद्याअंतर्हत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *