सीबीएसई, आयसीएसई, मंडळाच्या शाळांनी अद्याप गणपतीच्या सुट्ट्या जाहीर केल्या नसल्याने पालक संभ्रमात

गणेशोत्सव सण जवळ आला की, कोकणातील चाकरमान्यांना गावाचे वेध लागतात. शाळांना सुट्ट्या असल्याने पत्नी, मुलांसह गणपतीला गावाला जाण्याचे प्लॅन आखले जातात. ट्रेन, बसचं बुकिंग आधीच फूल होत असल्याने तिकीट आधीच काढून ठेवाव्या लागतात. मात्र सीबीएसई, आयसीएसई, आयजी या अन्य मंडळांच्या शाळांनी अद्याप गणपतीच्या सुट्ट्या जाहीर केल्या नसल्याने पालक संभ्रमात आहेत. सुट्ट्यांबाबतच्या संभ्रमामुळे शाळेतील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवासाठी गावाला जाण्याची  अडचण निर्माण झाली आहे. यामुळे पालक, शिक्षकांबरोबरच आता स्कूल बस चालकांनीही राज्यमंडळाच्या शाळांप्रमाणे इतर मंडळांच्या शाळांनीही सुट्टी द्यावी, अशी मागणी केली आहे.

राज्य सरकारने 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला लागून पाच दिवस सुट्टी जाहीर केली आहे. मात्र सीबीएसई, आयसीएसई, मंडळाच्या शाळांना यंदा अद्यापपर्यंत  सुट्टी जाहीर केलेली नाही. शाळा बस चालक संघटनेनेही याविरोधात सरकारला पत्र दिलं आहे. विद्यार्थी, कर्मचारी व बसचालकांना सुट्टी दिली जावी अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *