कल्याणमध्ये थाटला UPSC चा क्लास, विद्यार्थ्यांना धमकी, मनसेकडून प्रसाद, आरोपी गजाआड

कल्याणमध्ये जीएसटी इन्स्पेक्टर असल्याचे सांगत स्पर्धा परीक्षांचे क्लास चालवणाऱ्या बोगस जीएसटी इन्स्पेक्टरला चोप देत त्याचा भांडाफोड महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे. विद्यार्थांची अवाजवी फी घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी पोलीसांनी या ठगाला त्याब्यात घेतले आहे.कल्याण रेल्वे स्टेशन समोर सिद्धार्थ लॉजिक नावाने यूपीएससी एमपीएससी बँकिंग रेल्वे आणि इतर स्पर्धा परीक्षांचे क्लास सिद्धार्थ सिंग चंडेल याने सुरू केले. आतापर्यंत आपण 700 विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत लावले असल्याचे सांगत विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेतले. मात्र या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे न शिकवता विद्यार्थ्यांकडून वारेमाप फी आकारून योग्य शिकवणी न देता विद्यार्थ्यांना दमदाटी करण्याचा प्रकार सिद्धार्थ चांडेल हा करत होता.

मनसे स्टाईल चोप
याची तक्रार या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष विनोद केणे यांच्याकडे केली असता, मनविसेचे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी,शहर अध्यक्ष विनोद केणे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या क्लास मध्ये जाऊन त्याच्याकडे त्याच्या जीएसटी इन्स्पेक्टर पदाबाबत विचारणा केली असता, त्याची बोबडी वळाली. सरकारी अधिकारी असतांना आपण क्लास कसे घेऊ शकता असा सवाल मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर न दिल्याने यावेळी संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सिद्धार्थ सिंग चांडेल याला मनसे स्टाईल चोप देत धडा शिकवला. तसेच विद्यार्थ्यांची घेतलेली फी परत करण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *