आई आजारी, जामीन द्या; ‘पोर्शे’ केसमधील बिल्डर अगरवालची मागणी; रक्त बदलाबाबतही धक्कादायक माहिती समोर

 पुण्यातील कल्याणीनगर भागात गेल्या वर्षी झालेल्या बहुचर्चित ‘पोर्श’ कार अपघातानंतर ससून रुग्णालयाप्रमाणेच औंध येथील जिल्हा रुग्णालयातही अल्पवयीन कार चालकासह त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाला होता, असा दावा सरकार पक्षाने केला आहे. या संदर्भात जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे जबाब असलेली कागदपत्रे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी मंगळवारी पुणे न्यायालयात सादर केली. तर आईच्या आजारपणाचं कारण पुढे करत कारचालक मुलाचा पिता, आरोपी विशाल अगरवाल याने जामिनाची मागणी केली आहे.

या प्रकरणातील सर्व आरोपींच्या विरोधात बनावट दस्तावेज तयार करण्यासह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलमे लागू होत नाहीत. त्यामुळे आरोप स्पष्ट होत नाहीत, असा युक्तिवाद बचाव आरोपींच्या वकिलांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *