शहरातील उच्चभ्रू भागांमध्ये स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या देह व्यापार रॅकेटवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. परिमंडळ 4 अंतर्गत येणाऱ्या विमानतळ तसेच बाणेर परिसरात दोन स्वतंत्र ठिकाणी टाकलेल्या धाडीत पोलिसांनी एकूण 18 मुलींची सुटका केली आहे. यामध्ये 10 हून अधिक परदेशी मुलींचा समावेश असल्याने, हे रॅकेट आंतरराष्ट्रीय पातळीवर चालत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण?
बाणेर येथील एका लक्झरी स्पा सेंटरवर धाड टाकण्यात आली. येथे दोन तरुणींची सुटका करण्यात आली. तपासातून समोर आले आहे की, ग्राहकांकडून ‘थेरपी’च्या नावाखाली हजारो रुपये आकारून त्यांचा वापर देह व्यापारासाठी केला जात होता. या स्पा सेंटरच्या मालकासह व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
