पंढरपूरकडे निघालेल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अखेर अटक

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात एक धक्कादायक घटना घडली होती. वारीतील वारकऱ्यांना लुटून 17 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आले होते. या घटनेतील दोन संशयित आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. समीर उर्फ लकी पठाण आणि विकास सातपुते अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना रांजणगाव येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. ही घटना 30 जून रोजी पहाटे 4 वाजता घडली होती. आरोपींना अटक करतानाचे CCTV फुटेज समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर उर्फ लकी पठाण हा माळशिरस तालुक्यातील आहे. तर विकास सातपुते हा इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील आहे. रांजणगाव येथे आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *