भारतीय हवाई दलाचे गुरुवारी मोठ्या उत्साहात ८३ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या ८३ व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. गाझियाबादमधील हवाईतळावर झालेल्या या कार्यक्रमात तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित होते.
जिद्द, चिकाटी आणि धाडसाने आपले जवान भारताची सेवा करत आहेत. हवाई दलाच्या जवानांना मी सलाम करतो, असे ट्विट पंतप्रधानांनी ट्विटरवरून शुभेच्छा देताना केले आहे. वर्धापनदिनानिमित्त हवाई दलाच्या जवानांनी प्रात्यक्षिके सादर केली.

