व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज, लातूरमध्ये अॅडमिनसह चौघांना अटक

लातूरमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडीओ टाकल्याप्रकरणी अॅडमिनसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. चाकूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

चाकूरच्या नळेगावमध्ये ‘वडवळचा राडा’ नावाचा व्हॉट्सअॅ ग्रुप आहे. त्यावर आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडीओ टाकून, त्याद्वारे भावना भडकावल्याच्या आरोपाखाली, ग्रुप अॅडमिनसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी चौघांनाही अटक केली.

शिवाजी बरचे, राजकुमार तेलंगे, अमोल सोमवंशी आणि मनोज लव्हराळे अशी आरोपींची नावं आहेत. सगळ्यांचे मोबाईल जप्त केले असून त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 153, 34 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *