ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक परमार यांची आत्महत्या

येथील कॉस्मोस ग्रुपचे प्रमुख बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. ही घटना कासारवडवली येथे घडली.

परमार यांनी कासारवडवलीतील एका प्रकल्प कार्यालयात स्वतःवर गोळी चालवली. त्यांनी गोळी डोक्यात मारून घेतली. ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जाग्यावरच मृत्यू झाला.

त्यांचा मृतदेह ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आलाय. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अजून समजून आलेले नाही. कासारवडवली पोलीस अधिक तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *