प्रत्येक तासाला कोट्यवधींची कमाई, एका दिवसात अब्जाधीश होतात गौतम अदानी, एकूण संपत्ती किती?

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी यांचे देखील नाव आहे. अमेरिकेतील न्यायालयाच्या एका निर्णयामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली आहे. आशिया आणि भारतामध्ये मोठा प्रभाव असणाऱ्या गौतम अदानी यांना 2 वर्षांमध्ये शेअर्समध्ये दुसरा सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. जानेवारी 2023 मध्ये सुरुवातीला हिंडनबर्गच्या रिपोर्टनुसार, अदानी समूहाचे शेअर्स हे मोठ्या प्रमाणात घसरले होते.

फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, गौतम अदानी हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 116 अब्ज डॉलर्स म्हणजे (9.70 लाख कोटींहून) अधिक आहे.
त्याच वेळी, हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबाने गेल्या 5 वर्षांमध्ये सर्वाधिक संपत्ती मिळवली आहे. अदानी व्हेंचर्सने गेल्या 5 वर्षात ऊर्जा क्षेत्रात 10,21,600 कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे त्यांच्या संपत्तीत मोठा बदल झाला आहे. गेल्या 5 वर्षात भारतातील सर्वात मोठ्या अब्जाधीशांची एकूण संपत्ती 10 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

अदानी कशामधून करतात इतकी कमाई? 

गौतम अदानी हे एक जगातील अब्जाधीश उद्योगपतींपैकी एक आहे. ज्यांना अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून ओळखले जाते. अदानी समूह भारतात अनेक व्यवसाय आहेत. ज्यामध्ये पोर्ट, ऊर्जा, सिमेंट आणि इतर व्यवसायांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. अदानी समूहाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बंदरे, विमानतळ, वीज निर्मिती आणि ट्रान्समिशन, हरित ऊर्जा ही आहेत.

या कंपन्यांमधून अदानी करतात कमाई

दरम्यान, अनेक माध्यमांनी गौतम अदानी यांच्या एका दिवसात आणि एका तासात झालेल्या कमाईबद्दल वेगवेगळे दावे केले आहेत. जर या सर्व माध्यमांनी केलेल्या दाव्यावर आपण विश्वास ठेवला तर, गौतम अदानी हे एका तासात 34,42,10,890 रुपये आणि एका दिवसात सुमारे 8,26,10,61,361,25 रुपये कमवतात. हा फक्त माध्यमांनी केलेला दावा आहे.

गौतम अदानी यांना संपत्तीचा मोठा भाग आहेत या सहा कंपन्या. ज्यामध्ये अदानी एंटरप्राइजेज (75%), अदानी पावर (72%), अदानी टोटल गैस (37%), अदानी एनर्जी सॉल्यूशंस (73%), अदानी पोर्ट्स (66%), आणि अदानी ग्रीन एनर्जी (56%)  या कंपन्यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *