सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा मोठा उलटफेर झाला आहे. मौल्यवान धातुच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. इस्राइल आणि ईराण या दोन्ही देशांत गेल्या 10 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या दरम्यान MCXवर सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 820 रुपयांची घट झाली आहे. तर चांदीदेखील 557 रुपयांनी घसरून 106206 रुपयांवर पोहोचले आहे. आहे आहेत आजचे सोन्याचे दर जाणून घेऊयात.
आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील सोन्याच्या दरात घसरण नोंदवली आहे. सोनं 30 डॉलरने घसरून 3360 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे. तर चांदी एक टक्क्याने घसरून 36 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. या कारणामुळं गुंतवणुकदार आता जोखीम असलेल्या पर्यायंकडे वळत आहेत. सोनं-चांदीचे दर सोमवारी तेजीत होते. मात्र आज दरांमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत. आज भाव गडगडले आहेत. यामागे युद्धाचे परिणाम असल्याचे म्हटलं जातं आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 820 रुपयांची घसरण झाली असून सोनं प्रतितोळा 99,870 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 750 रुपयांनी घसरले असून प्रतितोळा 91,550 रुपयांवर स्थिरावलं आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याचे दर 610 रुपयांनी कमी झालं असून 74,910 रुपयांवर स्थिरावलं आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 91, 550 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 99,870 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 74, 910 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,155 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9, 987 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7, 491 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 79, 896 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 73, 240 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 59, 928 रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 91, 550 रुपये
24 कॅरेट-99,870 रुपये
18 कॅरेट- 74, 910 रुपये