‘विको’चे अध्यक्ष, प्रसिद्ध उद्योजक गजानन पेंढारकर यांचे निधन

‘विको’चे अध्यक्ष, प्रसिद्ध उद्योजक गजानन पेंढारकर यांचे निधन

‘विको’ उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक गजानन पेंढारकर यांचे प्रदीर्घ आजाराने गुरुवारी सकाळी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.

गेल्या काही दिवसांपासून पेंढारकर यांची प्रकृती खालावली होती. परळमधल्या अशोक टॉवरमधील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.

‘विको लॅबोरेटरीज’च्‍या माध्‍यमांतून मराठी उद्योगक्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला. विकोची आयुर्वेदिक उत्पादने जागतिक स्तरावर नेऊन पेंढारकरांनी जगभरात भारताचे नाव उज्‍ज्‍वल केले.

गोवा, नागपूर, डोंबिवलीमध्ये त्यांच्या कंपन्यांचा विस्तार आहे. हर्बल टूथपेस्ट, टूथपावडर, टर्मेरिक स्कीन क्रीम, हर्बल शेव्हिंग क्रीम, आयुर्वेदिक पेन रिलीफ अशी अनेक वैविध्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती विकोने केली आहे.

पेंढारकर यांच्यासारख्या प्रयोगशील उद्योगपतीच्या निधनामुळे उद्योग क्षेत्रात हळळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *