सनातनविरोधात सबळ पुरावे आढळले तर बंदी घालणार, मात्र पुरावे नसल्यास कुणाचाही दबाव आला तरी बंदी घालणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
सरकार राजधर्माचं पालन करणार असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी रोखठोक मुलाखतीत दिली.
घोटाळेबाजांची जागा निश्चित करून ठेवली आहे. त्यामुळं चौकशीत जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई होणारच असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत व्यक्त केलाय.
घोटाळेबाजांसोबत कुठलीही सेटलमेंट होणार नाही अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

